लोकगीत प्रकारात राजन सरवदे, स्वरांजली पांचाळ, सचिन जाधव, जोतिबा बडे, यशश्री पाठक, अधिराज जगदाळे, अनंत खलुले यांनी, तर लोकनृत्यात ऐश्वर्या पाटील, साक्षी आदमाने, अरुणा आडे, दीप्ती जाधव, रूपाली हत्तरगे, तनुजा शिंदे यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना डॉ. संदीपान जगदाळे, डॉ. देवेंद्र कुलकर्णी, प्रा. शरद पाडे, सुरज साबळे, स्नेहा शिंदे, कार्तिकी पाठक, सिद्धी गोरे, वैष्णवी वडगावे, सुदर्शन भुरे, अनमोल कांबळे, श्रीनिवास बरिदे यांनी मार्गदर्शन केले. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, अरविंद सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी रमेश बियाणी, सुरेशजी जैन, संजय बोरा, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, कृष्णा केंद्रे, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिल माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, नवनाथ भालेराव आदींनी कौतुक केले.
दयानंद कलाच्या लोकनृत्य व लोकगीताची राज्यस्तर महोत्सवासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST