लातूर : राष्ट्रीय प्रज्ञाशोध राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेत नेटीझन्स फाऊंडेशन अकादमीच्या ३२ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय परीक्षेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून ९४ हजार २२८ जणांनी परीक्षा दिली होती, त्यातून ८२१ विद्यार्थ्यांची निवड झाली. लातूर जिल्ह्यातून ५५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. नेटीझन्सचा वरद नंदकिशोर मल्लूरवार हा राज्यातून दुसरा तर जिल्ह्यात प्रथम आला आहे. तसेच रोशन सुधाकर तोडकर राज्यात पाचवा, जिल्ह्यात दुसरा आला. ईडब्ल्यूएस संवर्गात राज्यात शंतनू नाथराव आमले प्रथम तर अनुसूचित जाती संवर्गात विश्वजीत प्रभाकरराव सेलूकर राज्यात तिसरा व जिल्ह्यात प्रथम आला आहे. सर्वसाधारणमध्ये पहिल्या १०मधील ८ विद्यार्थी नेटीझन्सचे आहेत. सर्वसाधारण, अनुसूचित जाती, आर्थिक दुर्बल घटक या तीनही गटात प्रथम आलेले सर्व विद्यार्थी नेटीझन्स फाऊंडेशनचे आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रथमेश उदगीरे, रेणुका ब्याळे, शंतनू उरगुंडे, सार्थक खुणे, प्राची काेरे, वेदांत मुडपे, श्रावण मलवाडे, मानसी चव्हाण, मैथिली खर्चे, ओंकार स्वामी, संकेत नाईकवाडे, साक्षी पडगले, आदित्य गुंडरे, धनंजय पांढरे, संकेत कलशेट्टी, शिवप्रकाश चव्हाण, सुमीत साळुंके, प्रिया अणदूरकर, सुरजकुमार बेवनाळे, नवाझ सय्यद, नंदिनी तोगरीकर, आदित्य जाधव, सार्थक मठपती, जीवन करंडे, सानिका शेवडे, सर्वेश मुंडे, कल्याणी लाहुरीकर, सेजल सांजेकर यांचा समावेश आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नेटीझन्स अकादमीचे संचालक प्रा. एस. जे. तोडकर, प्रा. वैभव घटकार, मोहंमद हनीफ पठाण, डी. एन. शिंदे, राहुल गुप्ता, सोहेल खान, जयप्रकाश सिंग, तुषार कांत, महेश तोडकर, उमेश तोडकर, रेणुका गायकवाड, गणेश बेडगे, आदींनी कौतुक केले.