गाडीवरील कर्ज कसे फेडणार?
माझी पूर्वी एक स्कूल व्हॅन होती. विद्यार्थी संख्या वाढल्याने पुन्हा दुसरे वाहन खरेदी केले. काही दिवस व्यवसाय चांगला चालला. मात्र कोरोनाने सर्वच डबघाईला आले. आता वाहनावर असलेल्या कर्जाचे हप्ते भरणे अवघड झाले आहे. यासाठी एक वाहन विक्रीला काढले आहे.
- इस्माईल शेख
शाळा सुरू असताना आमच्याकडे तीन स्कूल व्हॅन होत्या. या व्हॅनमधून जवळपास दहा किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात होती. शाळा बंद झाल्याने हा सर्व व्यवहार कोलमडला. यातून वाहनावर हजारो रुपयांचे कर्ज थकले आहे.
- अरुण शेवाळे
चालकांचे हाल वेगळेच
कोरोनापूर्वी स्कूल व्हॅनवर चालक म्हणून काम करीत होतो. यातून महिन्याला प्रपंच इतपत उत्पन्न मिळत होते. शाळाच बंद असल्याने हे काम थांबले आहे. आता जगण्याचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहेत. भाजीपाला विक्री आणि इतर रोजगार करावा लागत आहे.
- अहमद शेख
लातूर शहरातील तीन शाळांतील विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल व्हॅनमधून करत होतो. त्यातून महिना २५ ते ३० हजार रुपयांची उलाढाल होत होती. इंधन आणि बँकेचा हप्ता भरून घर खर्चापुरते पैसे मिळत होते. आता ते ठप्प झाल्याने हाल सुरू झाले आहेत.
- प्रवीण गायकवाड