शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात टंचाईच्या झळा; २७ गावांच्या अधिग्रहण प्रस्तावावर निर्णय होईना!

By संदीप शिंदे | Updated: April 19, 2023 18:07 IST

या गावांनी पंचायत समितीकडे विहीर,विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा,अशी मागणी केली आहे.

लातूर : जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या चटक्यासोबतच प्रकल्प, विहिरी, विंधन विहिरीची पाणीपातळी खालवत चालली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २७ गाव-वाड्यांवर पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या गावांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करावा, यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, त्यावर अद्याप पंचायत समिती आणि तहसील प्रशासनाकडून कोणताच निर्णय झालेला नाही. परिणामी, २७ गावांतील नागरिकांना प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षा लागली आहे.

जिल्ह्यात २२ गावे आणि ५ वाड्या असे एकूण २७ गावांनी ३० प्रस्ताव संबधित पंचायत समितीकडे सादर केले आहेत. यामध्ये लातूर तालुक्यातील १, औसा २, निलंगा ३, अहमदपूर १६, उदगीर २ तर जळकोट तालुक्यातील ३ गावांचा समावेश आहे. या गावांनी पंचायत समितीकडे विहीर, विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार तहसील कार्यालयाकडे १४ गावांचे प्रस्ताव सादर झाले आहेत. हे प्रस्ताव तहसील कार्यालयाच्या मान्यतेनंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे जातील. त्यांच्याकडून प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करण्यात येणार असून, त्यानंतरच प्रस्तावाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. प्रकल्प, नदी, नाले ओसंडून वाहिले होते. परिणामी, पाणीपातळीत वाढ झाली. मात्र, आता उन्हाचा पारा वाढत असल्याने जलस्रोतांची पाणीपातळी कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव दाखल केल्यावर तहसील आणि नंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे जातात. त्यामुळे या प्रस्तावांना वेळ लागत असून, यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरावरच अधिकार देण्याची मागणी होत आहे.

जुलै ते ऑगस्टसाठी सव्वा चार कोटींचा आराखडा...जिल्ह्यात एप्रिल ते जून या कालावधीत पाणी टंचाई निवारणासाठी चार कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाने जुलै ते ऑगस्ट या कालावधीत पावसाचे प्रमाण कमी सांगितले आहे. परिणामी, नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पूर्वतयारी म्हणून प्रशासनाकडून सव्वा चार कोटींचा विशेष टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, त्यास मान्यताही देण्यात आली आहे.

अधिग्रहणासोबतच टँकरद्वारे होणार पाणीपुरवठा...टंचाई निवारणासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना राबविणे, विहिरीचे खोलीकरण करणे, बुडक्या घेणे, विंधन विहिरी घेणे, विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, प्रगती पथावरील नळ योजना पूर्ण करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. त्यानुसार प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावधीपर्यंत २७ गावांचे प्रस्ताव आले असून, मे महिन्यात उन्हाचा पारा वाढल्यास या प्रस्तावामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी