ग्राहक पंचायतीची विभागीय बैठक राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड, सचिव अरुण वाघमारे, सदस्या मेघा कुलकर्णी, सदस्य प्रमोद कुलकर्णी, विभाग सचिव डी. एस. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाली. कामाच्या सोयीसाठी औरंगाबादचे दोन विभाग करण्यात आले आहेत. औरंगाबाद अध्यक्षपदी माने तर विभाग संघटक हेमंत वडणे, उपाध्यक्ष बाहेकर यांची निवड करण्यात आली. सदर बैठकीस औरंगाबाद विभागात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक चातुरमास घेण्याचे निश्चित करण्यात आले. औरंगाबाद विभागीय अध्यक्षपदी सतीश माने यांच्या निवडीचे लातूर जिल्हाध्यक्ष जगदिश भराडिया, विजय गिल्डा, बी. जी. शिंदे, बालासाहेब शिंदे अतनूरकर, प्रल्हाद तिवारी, राजू रायवाडे, ॲड. नारायण सोमवंशी, विवेक खरे, पांडुरंग जवळे, धनाजी माटेकर, चंद्रकांत शिंदे, प्रा. नामदेव कारभारी, व्यंकटराव भोसले, अचल ओस्तवाल, अजिज अब्दुल मुल्ला, प्रा.पांडुरंगराव मुठ्ठे, गणेश गुराळे, विठ्ठल पाटील, व्यंकट ढोपरे, दिलीप ढोबळे, जगदीश सूर्यवंशी यांनी स्वागत केले. यावेळी बालासाहेब शिंदे यांच्या हस्ते माने यांचा सत्कार करण्यात आला.
ग्राहक पंचायतच्या विभागीय अध्यक्षपदी सतीश माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:25 IST