बेलकुंड (ता. औसा) येथील संत मारोती महाराज कारखान्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. श्रीशैल्य उटगे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, कारखान्याचे व्हा. चेअरमन शाम भोसले, उदयसिंग देशमुख, समद पटेल, सचिन दाताळ, दिनेश राशीनकर, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, कारखाना सुरू झाल्यानंतर आगामी दोन-तीन गळीत हंगाम विक्रमी झाले पाहिजेत, तरच शेतकऱ्यांचे स्वप्न साकार होऊ शकेल. लोकनेते विलासराव देशमुख यांनी या कारखान्याची उभारणी केली. येथील शेतकऱ्यांचे कल्याण झाले पाहिजे या कर्तव्याच्या भावनेपोटी आम्ही हे करीत आहोत. चेअरमन गणपत बाजुळगे यांनी प्रास्ताविक, संचालक सचिन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. व्हा. चेअरमन शाम भोसले यांनी आभार मानले.
कारखान्याला अर्थ, मनुष्यबळाची कमतरता भासू देणार नाही
पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, साधारणतः अडीच वर्षांपूर्वीच्या कारखाना निवडणुकीत हा कारखाना सुरू करण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रयत्न करून शासनाची थकहमी कारखान्याला देण्यात आली. शिवाय, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेनेही करखान्यावरील कर्जाचे पुनर्गठन केले. कर्जाच्या परतफेडीची मुदतही दोन वर्षांनी वाढविली. कारखान्याच्या डागडुजीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. कारखान्याला अर्थपुरवठा व मनुष्यबळाची कमतरता भासू देणार नाही.