राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तालुक्यातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मंजुरी समितीमार्फत पुढाकार घेऊन पात्र बेघर नागरिकांच्या घरासाठी मंजुरी मिळवून दिली आहे. त्यामुळे छपराच्या घरात राहणाऱ्या लोकांना आता पक्की घरे बांधून मिळतील. त्यामुळे जळकोट तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला आहे. विमुक्त, भटक्या जाती-जमाती, वाडी-तांड्यावर राहणाऱ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत ९४७ घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. तर सर्वसाधारण गटासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ५९९ घरांना मंजुरी देण्यात आली असून, प्रत्येक घराच्या बांधकामासाठी १ लाख ३८ हजार रुपये लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. निधी प्राप्त होताच पात्र लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या घरकुलाचे कार्यारंभ आदेश देण्यात येतील, असे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी सांगितले. स्थापत्य अभियांत्रिकी सुवर्णकार, व्ही.एस. वारकड, आर.डी. श्रीनिवास पाटील. जी.जी. सरताळे, किरण भुरे, सईद लाटवाले, एच.बी. बाबा यांनी बेघर लोकांचा सर्व्हे करून तसा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविला होता.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत १५४६ घरांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST