शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ या वर्षातील इयत्ता ६ वी अ, ब या वर्गात प्रत्येकी ४५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तर इयत्ता ७ वी ते १२ वी विज्ञान या वर्गात मर्यादित प्रवेश दिला जातो. सैनिकी विद्यालयात इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वी (विज्ञान) वर्गाची अनुसूचित जमातीची एक स्वतंत्र तुकडी आहे. या वर्गात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. ही प्रवेशपूर्व परीक्षा विद्यार्थी ज्या वर्गात आहे, त्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. तेव्हा या परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन विद्यालयाचे कमांडंट कमांडर बी. के. सिंह, प्राचार्य वसंत कुलकर्णी, सीमा मेहत्रे, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के यांनी केले आहे.
सैनिक विद्यालयाची प्रवेशपूर्व परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST