शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश प्रक्रिया; लातूर जिल्ह्यात २०० शाळांमध्ये १६६९ जागा, अर्जासाठी १७ मार्चची डेडलाईन

By संदीप शिंदे | Updated: March 1, 2023 18:04 IST

आरटीईची प्रक्रिया दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात होत असते. यंदा या प्रक्रियेस उशिर झाला

लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यासाठी जिल्ह्यातील २०० शाळांनी शिक्षण विभागाकडे नाेंदणी केली असून, १ हजार ६६९ जागांवर मोफत प्रवेश होणार आहेत. दरम्यान, ऑनलाईन अर्ज करण्यास बुधवारपासून सुरुवात झाली असून, १७ मार्च अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

आरटीईची प्रक्रिया दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात होत असते. यंदा या प्रक्रियेस उशिर झाला असून, सुरुवातीला शाळांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारपासून विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली. १७ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार असून, त्यानंतर राज्यस्तरावर सोडत काढली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेश पाठविण्यात येणार असून, कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

शिक्षण विभागाकडे २०० शाळांची नोंदणी...आरटीईसाठी २०० शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. यामध्ये अहमदपूर १४, औसा १७, चाकूर ११, देवणी ०८, जळकोट ०४, लातूर ८७, निलंगा २४, रेणापूर ०७, शिरुर अनंतपाळ ०२ तर उदगीर तालुक्यातील २६ शाळांचा समावेश आहे. दरम्यान, या शाळांमध्ये एकूण १६६९ जागा असून, नवीन शैक्षणिक वर्षापर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी ही कागदपत्रे आवश्यक...बालकाचा जन्मदाखला, आधार कार्ड, सामाजिक आरक्षणाचा दाखला, पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, बालकाचा फोटो, रहिवासी पुरावा, गॅस कार्ड, बँकेचे पासबुक, घरभाडे करार आदी कागदपत्रे लागतात. अर्ज भरण्यास बुधवारी दुपारी ३ वाजेपासून सुरुवात झाली असून, मुलांचे अर्ज भरण्यासाठी पालकांनी संगणक केंद्रांवर गर्दी केली होती.

पंचायत समितीत कागदपत्रांची पडताळणी...आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये राज्यस्तरावर सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पंचायत समिती येथे कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतरच शाळेत प्रवेश निश्चित होईल. दहा तालुक्यातील पंचायत समितीमध्ये कागदपत्रे पडताळणीसाठी कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाlaturलातूर