शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार वाहनांवर ५० लाखांची थकबाकी! दंड वसुलीसाठी पोलिसांनी सुरु केली विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 19:24 IST

दंडाच्या वसुलीसाठी पाेलिसांकडून विशेष माेहीम हाेती घेण्यात आली आहे

- राजकुमार जाेंधळे लातूर : शहरासह जिल्ह्यातील २३ पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत बेशिस्त, नियम माेडणाऱ्या वाहनधारकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात तब्बल १२ हजार वाहनांवर खटले दाखल करण्यात आले असून, त्यांना एक काेटीचा दंडही केला आहे. यातील जवळपास ५० लाखांचा दंड अद्यापही वाहनधारकांकडे थकला आहे. दंडाच्या वसुलीसाठी पाेलिसांकडून विशेष माेहीम हाेती घेण्यात आली आहे. परिणामी, वाहनधारकांना आता नाेटिसा बजावण्यात आल्या आहेत.

केंद्राच्या वतीने करण्यात आलेल्या नवीन माेटार वाहन कायद्यानुसार आता दंड आकारला जात आहे. त्यानुसारच संबंधित वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध मार्गावर पाेलिसांनी नाकाबंदी करत वाहनतपासणी माेहीम हाती घेतली असून, प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. वाहनधारकांकडे आढळलेल्या त्रुटी आणि नियमांचे झालेले उल्लंघन यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

नियमांचे उल्लंघन पडले महागात...ई-चलनाच्या माध्यमातून दंड केला आहे. या दंडाचा मेसेज त्यांच्या माेबाईलवर क्षणात पाठविला जाताे. त्यानंतर ताे दंड भरण्याबाबत सतत मेसेज पाठविले जातात. वारंवार सांगूनही जे वाहनधारक दंडाची रक्कम भरत नाहीत, त्यांना न्यायालयाकडून नाेटिसा बजावल्या जात आहेत. हा दंड ऑनलाईन पद्धतीने भरण्याचीही सुविधा आता उपलब्ध झाली आहे. शिवाय, त्या-त्या पाेलीस ठाण्यातही ही रक्कम भरता येईल. तर तालुक्याच्या स्तरावर भरणाऱ्या लाेकअदालतीमध्ये तडजाेड करता येते.

ट्रिपलसीटवाल्यांना दणका...लातूर शहरात पाेलिसांची नजर चुकवत काही जण ट्रिपलसीट सुुसाट आहेत. त्यांच्या वरही जानेवारी महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. नव्या कायद्यानुसार त्यांना दंड आकरण्यात आला आहे. १०२ वाहनधारकांना एकूण १ लाख २ हजारांचा दंड करण्यात आला आहे. त्यापाठाेपाठ रस्त्यावर बेशिस्तपणे वाहन थांबविणाऱ्यांवर १७ हजारांचा दंड केला आहे. तर लायसन्स न दाखिवणेही अंगलट आले आहे. त्यांना तब्बल २ लाख १४ हजारांचा दंड केला आहे.

टॅग्स :laturलातूरPoliceपोलिस