टवाळखोरांवर कारवाई नाही !
गल्लोगल्ली, अंतर्गत रस्त्यांवर जाहीरपणे टवाळखोर तरुण वाढदिवस साजरे करतात. गटागटाने थांबलेले असतात, त्यांना हटकणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. जिथे अशी गर्दी असते तिथून वर्दीत जाणारा माणूसही न हटकता गुपचूप निघून जातो.
दोन पोलीस दिले तरी पुरे...
लातूर शहरात सर्वाधिक रुग्ण आहेत. शहराची एकूण व्याप्ती पाच-सहा किलोमीटरची आहे. त्यात मनपा, महसूलची किमान ५० पथके आणि प्रत्येक पथकाला दोन पोलीस देऊन विनामास्क फिरणाऱ्यांना दंड, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली तर प्रसार आटोक्यात येईल.
फिरते पथक आणि कारवाई...
लोकांच्या संचारावर बंदी न आणता सर्वांना नियमांमध्ये बांधून ठेवण्याची किमया प्रशासनाने साधली पाहिजे. एकाही दुकानावर एकही पथक मास्क का लावला नाही, विचारायला आलेले नाही. पेट्रोलिंगसारखे काम झाले तर काही दिवसांत शिस्त लागणे शक्य आहे. फिरत्या पथकाकडून जास्तीत जास्त कारवाई झाली तर कष्टकऱ्यांवर, उद्योगांवर संक्रांत येणार नाही.
हॉटेल्स, बार, रेस्टाॅरंटची फक्त पार्सल सुविधा
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी शुक्रवारी नवीन आदेश काढले. त्यानुसार हॉटेल्स, बार, रेस्टॉरंटमध्ये बसून खाण्या-पिण्यास ४ एप्रिलपर्यंत मनाई असणारे आहे. मात्र पार्सल सुविधा सुरू राहील. तसेच चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मंगल कार्यालये बंद राहतील. योगा, खेळाची मैदाने, व्यायामशाळा, स्वीमिंग पूल, पर्यटन व करमणुकीची स्थळेही बंद राहतील.