पोलिसांनी सांगितले, आसाम राज्यात कार्यरत असलेले महाळंगी येथील साैदागर राजाराम चरक हे लातूर राेड येथे वास्तव्याला आहेत. ते सध्याला गावाकडे एक महिन्याच्या रजेवर आले आहेत. दरम्यान, मंगळवारी पहाटे दाेन वाजण्याच्या सुमारास घरासमाेर चाेरेटे आल्याची चाहूल कुटुंबीयांना लागली. खिडकीतून बाहेर डाेकावून पाहिले असता, हातात बॅटरी घेऊन आलेले लाेक दिसून आले. त्यावर चरक यांच्या घराच्या संरक्षण भितींवरून दराेडेखाेरांनी घरात प्रवेश केला. घराच्या मुख्य दरवाजाला धक्के मारून ताे ताेडून आत प्रवेश केला. दाेघांनी कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवत धमकाविले, तर अन्य दाेघांनी घरातील कपाटात ठेवलेले दहा ताेळ्यांचे साेन्याचे दागिने घेतले. जाताना चरक आणि त्यांच्या पत्नीजवळील माेबाइलही हिसकावत पळ काढला. घटनेची माहिती चाकूर पाेलीस ठाण्यात दिली. घटनास्थळी पाेलीस उपविभागीय अधिकारी विद्यानंद काळे, पाेलीस निरीक्षक साेपान सिरसाट यांनी भेट देऊन पाहणी केली.
जिल्ह्यात पाेलिसांची नाकाबंदी...
लातूर राेड येथील जवानाच्या घरावर टाकलेल्या दराेडेखाेरांना पकडण्यासाठी पाेलीस प्रशासनाने जिल्ह्यात नाकाबंदी लावली आहे. दरम्यान, सकाळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. श्वानाने लातूर ते नांदेड महामार्गापर्यंतच माग काढला. अहमदपूर येथे पाेलिसांनी नाकाबंदी केली असता, कारमधून दराेडेखाेर जात असल्याचा संशय पाेलिसांना आला. यावेळी पाेलिसांनी सदर कारचा पाठलाग केला. आयटीआय भागात चाेरट्यांनी कार साेडून अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
चाेरीतील कार वापरली गुन्ह्यात...
लातूर राेड येथील दराेड्यात चाेरट्यांनी वापरलेली कार ही बीड जिल्ह्यातील अंबेजाेगाई येथून २७ जून राेजी समाेर आली आहे. सदरची टाेळी सराईत असल्याचा अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे. आता चाेरीतील ती कार पाेलिसांच्या हाती लागली आहे. टाेळीने लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात गुन्हे केल्याचा अंदाज पाेलिसांना आहे. त्यानुसार, तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली आहे.