कोरोनामुळे तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शासनाने हाताला काम द्यावे. कलाकरांना शासनाने १० हजार रुपये मानधन जाहीर करावे. संगायोमधील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करावी. रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही २ लाख ५० हजारांचे अनुदान द्यावे. ५ ब्रास वाळू मोफत द्यावी. आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सेवकांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन रिपाइंचे तालुकाध्यक्ष विनोद कांबळे यांनी दिले.
या आंदोलनात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष देवीदास कांबळे, तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष कोंडिबा सवारे, जिल्हा सहसचिव सुरेश गायकवाड, बाबासाहेब कांबळे, अनिल काळे, अण्णाराव कांबळे, विकास राठोड, संजय गायकवाड, बजरंग वाघमारे, अमोल गायकवाड, राहुल गायकवाड, माधव वाघमारे, मिलिंद कोकणे, पंकज गायकवाड, तिरुपती सूर्यवंशी, देविदास आडे, दिनेश आडे, संतोष गायकवाड, प्रदीप कांबळे, सुधीर विराळे आदी उपस्थित होते.