शाळांनी ही घ्यावी काळजी...
शाळांनी ऑनलाइन वर्गासाठी त्या-त्या वर्गाचा स्वतंत्र ग्रुप तयार केला आहे. अशावेळी अनेकदा पालक किंवा विद्यार्थ्यांनी दिलेले माेबाइल क्रमांक बदलले असतात. तर माेबाइल क्रमांक ग्रुपमध्ये कायम राहताे. ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांनाच जाॅइन करून घेतले पाहिजे. अनाेळखी व्यक्तीचा क्रमांक डिलिट केला पाहिजे. शाळांनी काळजी घेणे हाच उत्तम पर्याय आहे.
पालकांनीही दक्ष राहण्याची गरज...
मुलांचा ऑनलाइन क्लास सुरू असताना, त्यांच्या हालचालींवर आपले पालक म्हणून अधिक लक्ष राहण्याची गरज आहे. घरातील एखाद्या माेठ्या व्यक्तीने ऑनलाइन क्लास सुरू असताना मुलांच्या जवळ बसून राहावे. काही अडचणी आल्यातर त्या मुलांना समजून सांगता येतात. शिवाय, यातून मुलांवर वाॅच ठेवता येताे.
असेही घडू शकते...
फुकटच्या ॲपमुळे अनेक शाळा, पालकांची डाेकेदुखी वाढली आहे. क्लास सुरू असताना मध्येच अचानक नकाे ते मेसेज, व्हिडिओ क्लीप व्हायरल हाेतात. त्यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये गाेंधळ उडताे. यासाठी काळजी घेणे, सतत दक्ष राहण्याची गरज आहे.
फुकटचे ॲप नकाे...
ऑनलाइन क्लाससाठी शाळांकडून विविध ॲप डाऊनलाेड केली जात आहेत. अशावेळी परिपूर्ण माहिती घेऊनच ॲप घेण्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. सध्या माेठ्या प्रमाणावर ॲप आणि जाहिरातींचा बाजार आहे. अशावेळी शाळा आणि पालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. नकाे ते मेसेज, व्हिडिओ व्हायरल झाले तर त्याला राेखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- पाेउपनि. सुरज गायकवाड, सायबर सेल, लातूर.