समता विद्यालयात विद्यार्थ्यांची तपासणी
लातूर - समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जोडजवळा येथे विद्यार्थ्यांची कोरोना चाचणीत करण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र जोडजवळा येथील आरोग्य कर्मचा-यांची उपस्थिती होती. ६४ विद्यार्थ्यांची चाचणी झाली यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याप्रसंगी प्राचार्य किसन बिरादार, अच्युतराव काळे, शंकर पंडीत, कमलाकर काळे, गणेश माने, वैशाली कांबळे, विनायक सोळुंके, शालिग्राम जिरंगे,श्री प्रकाश पाटोळे, माधव पिठलेवाड, प्रा. अश्विन कांबळे, प्रा. भाऊराव वनकुद्रे, राम महांडुळे, सिद्धेश्वर उकिरडे, सटवाली जाधव आदींची उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांचा सत्कार
लातूर : दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांची युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, नेहरू युवा केंद्राच्या सल्लागार समितीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नेहरु युवा केंद्राच्या साक्षी समैय्या, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, संजय ममदापूरे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ.संतोष पाटील, कार्यक्रमाधिकारी प्रा. विलास कोमटवाड प्रा.महेश जंगापल्ले आदींसह प्राध्यापक, कर्मचा-यांची उपस्थिती होती.