रॉयल्टीसाठी पथक सक्रीय...
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोळपा शिवारात अनाधिकृतपणे सुरू असलेल्या वाळू उपशावर भल्या पहाटे तहसीलदार स्वप्नील पवार यांनी चार पथके तयार करून कारवाई यशस्वी व्हावी म्हणून खाजगी वाहनांचा वापर करून धडक कारवाई केली. गुरूवारी अंकोली शिवारातील दोन खडी केंद्राला टाळे लावण्यात आले आहे. मार्च महिन्यात वसुलीसाठी पथक अधिक सक्रीय झाले आहे. गुरूवारी पथकात नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी मलवाड, हरंगुळचे तलाठी डोईजोडे यांचा समावेश होता.
९ कोटी ९४ लाख वसूल...
लातूर तहसील कार्यालयाल गौण खनीज रॉयल्टीतून १२ कोटी रूपयांचे उद्दिष्ट होते. त्यात आतापर्यंत ९ कोटी ९४ लाख वसूल झाले आहेत. उर्वरित उद्दिष्टपुर्तीसाठी कडक मोहिम राबविण्यात येत आहे. अंकोली शिवारात महेश सूर्यवंशी, राजकुमार चव्हाण यांच्या खडी केंद्राला सील लावण्यात आले. सायंकाळी महेश सूर्यवंशी यांनी १० लाखांचा भरणा केला असल्याचे नायब तहसीलदार राजेश जाधव यांनी सांगितले.