विशेष प्रावीण्यासह १६, प्रथम श्रेणीत १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोमल एकुरके हिने ९५ टक्के गुण घेऊन प्रथम, भाग्यश्री शिंदे हिने ९०.२० टक्के घेऊन द्वितीय आली आहे, तसेच वैष्णवी सईतपुरे हिने ८९ टक्के, नंदिनी गाडे ८८ टक्के, प्रिया रणदिवे ८६ टक्के, चैत्राली तोडकरी ८४ टक्के, प्रतीक्षा माने ८४.६० टक्के, सतीश एकुरके ८३.२० टक्के, अंकिता कातळे ८३.४० टक्के, आर्यन करडे ८०.६० टक्के, शेख हुजेफ ८० टक्के गुण घेतले आहेत. गुणवंतांचे कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेकर, उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, सचिव प्रतिभाताई पाटील कव्हेकर, समन्वयक निळकंठ पवार, विनोद जाधव, संभाजी पाटील, गोरे, मुख्याध्यापक कोडतीवार, प्राथमिकचे मुख्याध्यापक बिडवे, उपमुख्याध्यापक जाधव, सूर्यवंशी, एन.एस. झुटे, ए.एस. कपाळे, डी.बी. मुंडे आदींनी केले.
छत्रपती शिवाजी विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST