येथील प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात प्रेम रमेश गायकवाड या मुलाच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, नायब तहसीलदार वृषाली केसकर आदी उपस्थित होते. अनुसूचित जाती प्रवर्ग महिला : उटी बु., बिरवली, कमालपूर, बोरगाव न., खुंटेगाव, चिंचोली का., रामेगाव, कुमठा, जवळगा पो.दे., एरंडी. अनुसूचित जाती सर्वसाधारण : कोरंगळा, लखनगाव, किनीनवरे, येळी, उजनी, तावशी ताड, आलमला, दावतपूर, तुंगी बु., अनुसूचित जमाती : गांजनखेडा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : हासलगा खु., कवठाळा, टका, हासाळा, शिवली, देवताळा, बानेगाव, येळवट, फत्तेपूर, चिंचोली जो., उंबडगा बु., वानवडा, तळणी, समदर्गा, एकंबी तांडा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण : करजगाव, पारधेवाडी, येल्लोरीवाडी, लोदगा, गोंद्री, उत्का, एकंबी, सारणी, भुसणी, चिंचोली तपसे, होळी, धानोरा, बेलकुंड, लामजना.
महिलांसाठी आरक्षित सरपंचपदे...
खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी नांदुर्गा, हासेगाव, खरोसा, जयनगर, येल्लोरी, मासुर्डी, कवळी, शिवणी बु., चिंचोली सो., बोरफळ, वाघोली, जावळी, भादा, वरवडा, सिरसल, किल्लारी, उंबडगा खु., सेलू, हासेगाववाडी, नागरसोगा, बऱ्हाणपूर, जायफळ, वांगजी, मंगरुळ, किनीथोट, सिंदाळा ज., आशिव, सिंदाळवाडी, मातोळा या गावांतील सरपंचपद आरक्षित आहे.
बुधोडा, भेटा, अंदोरा खुले...
बुधोडा, सारोळा, माेगरगा, अंदोरा, हारेगाव, लोहटा, भंगेवाडी, कन्हेरी, काळमाथा, हिप्परसोगा, तांबरवाडी, वडजी, माळकोंडजी, भेटा, चलबुर्गा, याकतपूर, सत्तरधरवाडी, शिवणी लख, गुळखेडा, हसलगण, गुबाळ, आपचुंदा, सिंदाळा लो., जमालपूर, आनंदवाडी, माळुंब्रा, हिप्परगा, लिंबाळा दाऊ, दापेगाव येथील सरपंचपद खुले झाले आहे.