औसा तालुक्यातील नागरसोगा येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. अरुण गुट्टे, सचिन डिग्रसे, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी संजयकुमार ढाकणे, संजय नाबदे, महेश क्षीरसागर, भुजंग पवार, शिरीष गणबहाद्दूर, अमृता राऊत, संभाजी राऊत, शिंदे, ओमप्रकाश सूर्यवंशी, मंडळ कृषी अधिकारी पिनाटे, गणेश राऊत, कृषी साहाय्यक मारुती वाघमारे, रवी कावळे, अमर भोसले, गिरी आदी उपस्थित होते.
या वेळी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पीक परिस्थितीची पाहणी केली. तसेच येथील अंजली मसलकर यांची मिनी डाळमिल, पापड यंत्र, मिरची कांडप यंत्राची पाहणी केली. त्यानंतर मालन राऊत यांच्या शेतातील भाजीपाल्याची पाहणी केली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाणे म्हणाले, कृषी विभागाच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम कृषी सहायकांनी करावे. कोणत्याही गावातील शेतकऱ्यांची तक्रार येऊ देऊ नये, याची दक्षता घ्यावी. या वेळी गावातील ओमप्रकाश सूर्यवंशी, मालन राऊत, अमृत राऊत या शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच गांडुळ खतनिर्मिती, ३ घनमीटर क्षमतेचे बायोगॅस प्रकल्प, सेंद्रीय शेतीची पाहणी केली.