शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशाबाबत श्वेतपत्रिका काढा; काँग्रेसच्या मोर्चात मागणी

By admin | Updated: January 6, 2017 21:17 IST

नोटाबंदीनंतर देशात किती काळा पैसा जमा झाला, याबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सहारा व बिर्ला ग्रुप यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप होत आहे

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 6 -  नोटाबंदीनंतर देशात किती काळा पैसा जमा झाला, याबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सहारा व बिर्ला ग्रुप यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप होत आहेत, याची नि:पक्ष चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शहर जिल्हा काँगे्रसच्यावतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
  नोटाबंदीनंतर देशात आर्थिक आणीबाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यावर पंतप्रधानांचे मौन आहे. सर्वसामान्य जनतेवर नोटबंदीचा परिणाम झाला असताना उपाययोजना आखल्या जात नाहीत. त्याच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून  निघालेला मोर्चा दुपारी १ वाजता तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन  देण्यात आले.
  या आहेत मागण्या 
 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाला आहे, याची नि:पक्ष चौकशी करण्यात यावी.
 - नोटाबंदी नंतर जिल्ह्यात काळा पैसा उघडकीस आला आहे का? असल्यास कोणाचा किती पैसा आहे, ते जाहीर करण्यात यावे.
 - जिल्ह्यात किती एटीएम आहेत? त्यातील किती एटीएम २४ तास सुरू आहेत?
 -जिल्ह्यातील एटीएम व बँकेसमोरच्या रांगा संपल्या आहेत का? रांगा संपल्या नसतील तर जबाबदारी कोणाची आहे.
 - नोटाबंदीच्या निर्णयाला दोन महिने पूर्ण होत असताना आजूनही बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा कायम का आहेत? आदी प्रश्नांची उत्तरे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात सरकाराला काँग्रेसने विचारली आहेत.