शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

लातूरकरांना दिलासा! तांत्रिक अडथळा दुर, उद्या सकाळपासून सुरळीत होणार पाणीपुरवठा

By संदीप शिंदे | Updated: January 19, 2023 18:25 IST

नांदेड नाका, शासकीय कॉलनी, राजधानी जलकुंभावरुन उद्या पाणी वितरण

लातूर : वारंवार तांत्रिक बिघाडामुळे लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडत आहे. बुधवारी हंरगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा बंद होता. बुधवारी रात्री उशिरा तांत्रिक अडथळा दुर झाल्याने पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ६ वाजेपासून नांदेड नाका, शासकीय कॉलनी, राजधानी आणि कम्युनिटी हॉल येथील जलकुंभावरुन पाणी वितरण होणार आहे.

लातूर शहरामध्ये ११ जलकुंभावरुन पाणी पुरवठा करण्याचे वेळापत्रक पाणी पुरवठा विभागाने प्रस्तुत केले आहे. परंतू, मंगळवारी हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर बिघाड झाला होता. त्यामुळे बुधवार आणि गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा ठप्प होता. आता तांत्रिक दुरुस्ती पुर्ण झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा पुर्ववत झाला आहे. नांदेड नाका येथील जलकूंभावरुन बरकत नगर, मळवटी रोड, महादेव नगर भागात पाणीपुरवठा होणार आहे. तर शासकीय कॉलनी येथील जलकुंभावरुन दिपज्योती नगर, हडको, चौधरी नगर, विकास नगर आदी भागांमध्ये पाणीपुरवठा होईल. तर कम्युनिटी हॉल परिसरातील जलकुंभावरुन माताजीनगर, मंत्रीनगर, गोपाळनगर आदी भागांमध्ये पाणीपुरवठा केला जाणार आहे. याशिवाय, राजधानी जलकुंभावरुन शिवनगर, गांधीनगर, मोतीनगर आदी भागामध्ये पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी वितरणाचे प्रमुख जलील शेख यांनी दिली.

मांजरा प्रकल्पातून दररोज ५० एमएलडी पाणी...मांजरा प्रकल्पातून दररोज लातूर शहरासाठी ५० ते ६० एमएलडी पाणी उचलले जाते. हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरण झाल्यानंतर जलकुंभनिहाय पाण्याचे वितरण होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रावरचा रात्री दुरुस्त झाल्यावर लागलीच मांजरा प्रकल्पातून पाणी उचलण्यात आले, असेही पाणी वितरण प्रमुख जलील शेख यांनी सांगितले. ५० ते ६० एमएलडी पाणी उचलून त्यापैकी गळती आणि शुद्धीकरणावरील गळती लक्षात घेता ४० ते ५० एमएलडी पाणी शहरात दररोज वितरीत होते.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी