शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

शेतकऱ्यांना दिलासा! माथाडी कामगारांचा संप मिटल्याने पाचव्या दिवशी आडत बाजारात सौदा

By हरी मोकाशे | Updated: February 28, 2024 18:52 IST

माथाडी कामगारांनी हमालीच्या दरात वाढ करावी म्हणून शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला होता.

लातूर : हमालीच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी माथाडी कामगारांनी बेमुदत संप पुकारला होता. दरम्यान, मंगळवारी बैठक होऊन बाजार समितीने दरवाढीचे आश्वासन देल्याने कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले. त्यामुळे बुधवारी शेतमालाचा सौदा निघाला. आवक आणि दर मात्र स्थिर राहिल्याचे पहावयास मिळाले.

सध्या रबी शेतमालाचा हंगाम सुरु आहे. हरभरा, तूर आणि सोयाबीनची सर्वाधिक आवक होत आहे. दरम्यान, माथाडी कामगारांनी हमालीच्या दरात वाढ करावी म्हणून शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला होता. त्यामुळे आडत बाजार बंद राहिला. परिणामी, शेतकऱ्यांची अडचण झाली. ती दूर करण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेऊन मंगळवारी माथाडी कामगारांची बैठक घेतली आणि सकारात्मक चर्चा करीत हमालीत वाढ करण्यासाठी १५ दिवसांची मुदत मागून घेतली. त्यास माथाडी कामगारांनी प्रतिसाद देत बुधवारपासून आडत बाजार सुरु राहिले, असे सांगितले. त्यामुळे पाचव्या दिवशी शेतमालाचा सौदा निघाला.

बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक...बाजार समितीत बुधवारी सर्वाधिक आवक सोयाबीनची झाली. ८ हजार ६८९ क्विंटल आवक झाली. कमाल दर ४ हजार ६५०, किमान ४ हजार ४३० तर सर्वसाधारण भाव ४ हजार ५३० रुपये प्रति क्विंटल असा मिळाला. हरभऱ्याची ७ हजार ९६४ क्विंटल आवक होऊन सर्वसाधारण भाव ५ हजार ८०० रुपये मिळाला. तसेच तुरीची आवक २ हजार ७५२ क्विंटल आवक होऊन साधारण भाव १० हजार १०० रुपये मिळाला.

रबी ज्वारी ३ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल...रबी ज्वारीची १९४ क्विंटल आवक होऊन सर्वसाधारण भाव ३ हजार ५५० रुपये असा मिळाला. गूळ - ३३२०, गहू- २८००, हायब्रीड- २०००, पिवळी- ५०००, बाजरी - २८००, करडई- ४३००, राजमा- ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटला असा भाव होता.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र