शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिलासा! हमाली दरवाढीच्या आश्वासनानंतर माथाडी कामगारांच संप मागे

By हरी मोकाशे | Updated: February 27, 2024 19:06 IST

माथाडी कामगारांनी हमालीच्या दरात वाढ करावी म्हणून शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला होता.

लातूर : हमालीच्या दरात वाढ करावी या मागणीसाठी माथाडी कामगारांनी शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला होता. दरम्यान, मंगळवारी बाजार समिती पदाधिकारी व माथाडी कामगारांची बैठक झाली. लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन बाजार समितीने दिल्याने माथाडी कामगारांनी आपला संप मागे घेतला आहे. त्यामुळे बुधवारपासून बाजार समितीतील व्यवहार पूर्वत सुरू होणार आहेत. 

सध्या रब्बीतील शेतीमालाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे बाजार समितीत दररोज जवळपास २० हजार क्विंटलची आवक होत होती. त्यातून दिवसासाठी १५ कोटींची उलाढाल होत होती. दरम्यान माथाडी कामगारांनी हमालीच्या दरात वाढ करावी म्हणून शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे अडचण झाली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी बाजार समितीने मंगळवारी दुपारी बाजार समिती संचालक आणि माथाडी कामगारांची बैठक बोलावली होती. बैठकीस सभापती जगदीश बावणे, संचालक शिवाजी कांबळे, सुधीर गोजमगुंडे, बालाप्रसाद बिदादा, माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी जाधव शरद कसबे लखन साबळे भरत कांबळे रज्जाकभाई शेख आदी उपस्थित होते. बैठकीत हमालीच्या दरात वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे माथाडी कामगारांनी आपला संप मागे घेत असल्याचे सांगून बुधवारपासून कामावर सहभागी होणार असल्याचे सांगितले. 

सकारात्मक चर्चा... माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे चार दिवसापासून बाजार समिती बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचण झाली. ती सोडवण्यासाठी आणि माथाडी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. बैठकीदरम्यान सकारात्मक चर्चा करून निर्णय घेऊ, तोपर्यंत माथाडी कामगारांनी कामावर यावे, असे आवाहन केले. त्यास माथाडी कामगारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. - जगदीश बावणे, सभापती. 

१५ दिवसांची मुदत...हमालीच्या दरात वाढ करावी म्हणून आम्ही संप पुकारला होता. मंगळवारी बैठकीदरम्यान बाजार समितीने दर वाढीसाठी पंधरा दिवसाचा कालावधी मागितला आहे. त्यानंतर दरवाढ करू, असे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे बुधवारपासून कामावर येत आहोत. - बालाजी जाधव, जिल्हाध्यक्ष राज्य माथाडी कामगार.

टॅग्स :laturलातूरMarket Yardमार्केट यार्ड