प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे म्हणाले, महाविद्यालयाची उंची ही त्या ठिकाणी कार्यरत असणारे गुणवंत व शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी यांच्यावर अवलंबून असते. सूत्रसंचालन शुभम स्वामी यांनी केले. आभार पृथ्वीराज कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशपाल ढोरमारे, रंगनाथ लांडगे, योगीराज माकणे, राम पाटील, आनंद खोपे, अशोक शिंदे, भीमाशंकर सुगरे, ओमकार स्वामी यांनी परिश्रम घेतले.
शिक्षक कॉलनी येथे नळ योजनेस प्रारंभ
लातूर : शहरातील शिक्षक कॉलनी, बाभळगाव रोड येथे लातूर शहर महापालिकेच्या वतीने नळ योजनेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, ॲड. दीपक सूळ, नगरसेवक विजयकुमार साबदे, वर्षा मस्के, अयुब मनियार, रघुनाथ मदने, महेश काळे, पी. सी. घंटे यांची उपस्थिती होती. नळाद्वारे शिक्षक कॉलनीला पाणीपुरवठा होणार असून, याबद्दल कॉलनीवासीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कॉलनीतील लक्ष्मण केंद्रे, बालाजी शिंदे, विलास कल्याणकर, मोहन कठारे, खंडू कलकत्ते, बंटी शिंदे, शिरसाठ, देशमनो, बिराजदार, कांबळे, हट्टे, गायकवाड, भिंगोले, आमगे, गवळी, शेळगे, सूर्यवंशी, माचपल्ले, सत्यनारायण शिंदे आदींसह नागरिक उपस्थित होते.
डॉ. केशव आलगुले यांचा सत्कार
लातूर : येथील जयक्रांती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. केशव विठ्ठल आलगुले यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने जिल्ह्यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार २०१९-२० साठी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.गोविंदराव घार, संस्थेचे सदस्य व प्राचार्य श्री. प्रशांत घार, प्राचार्य डॉ. पी. एन. सगर यांनी सत्कार केला. यावेळी डॉ. राजेश्वर खाकरे, माजी प्राचार्य डॉ. कुणाल बडदे, डॉ. रामेश्वर स्वामी, डॉ. अविनाश पवार, प्रा. प्रवीण अनभुले, प्रा. शरण निलंगेकर, प्रा. सुवर्णा शिंदे, सय्यद इब्राहिम यांची उपस्थिती होती.
रयतू बाजारात स्वच्छतेची मागणी
लातूर : शहरातील रयतू बाजार परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या वतीने कचरा उचलला जात असला तरी अनेक व्यापारी उरलेला भाजीपाला रस्त्याच्या कडेला टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, स्वच्छतेची मागणी होत आहे. सकाळ आणि सांयकाळच्या वेळी बाजारात खरेदीसाठी गर्दी असते. मात्र, अस्वच्छतेमुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी
लातूर : शहरातील बार्शी रोडवर गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट धावत आहेत. याच रस्त्यावर महिला तंत्रनिकेतन, महिला आयटीआय महाविद्यालय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अवजड वाहने याच रस्त्याने जात असल्याने गतिरोधक नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पूर्वी या रस्त्यावर गतिरोधक होते ,मात्र रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने गतिरोधक बसविण्यात आले नाही. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.