जिल्ह्यातील शाळांत ७० टक्के उपस्थिती
लातूर : जिल्ह्यात ५ वी ते आठवीचे वर्ग नियमितपणे सुरु झाले असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती ७० टक्क्यांवर पोहचली असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी सांगितले. ५ वी ते आठवीच्या एकूण १ हजार ७२३ शाळा आहेत. कोराना प्रतिबंधात्मक उपायोजनांचे पालन करीत या सर्वच शाळा पुर्ववत सुरु झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने पालकांशी संवाद साधला जात आहे.
उड्डाणपूल परिसरात वाहतूकीची कोंडी
लातूर : शहरातील उड्डाणपुल परिसरात वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. या भागातील सिग्नल बंद असल्याने वाहनांना अंदाज येत नाही. त्यातच एसटी बसेस, ट्रॅव्हल्ससाठी हाच मार्ग असल्याने वारंवार कोंडी होत आहे. रिक्षाही रस्त्यावर उभ्या केल्या जात असल्याने दुचाकीचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे शहर वाहतूक शाखेने लक्ष देण्याची मागणी नागरीकांमधून होत आहे.
शहरातील बाजारात भाजीपाल्याची आवक
लातूर : शहरातील बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. रयतू बाजारात कोथिंबीर, पालक, शेपू, वांगे, मिरची, लसून, कांदे, बटाटे आदींची आवक वाढली आहे. दरही स्थिर असून, सायंकाळच्या वेळी भाजीपाला खरेदीला गर्दी होत असल्याचे चित्र आहे.रेल्वे लाईन समांतर रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला असल्याने रयतू बाजारात एकाच बाजुला भाजीपाला विक्रीसाठी परवानगी आहे.
कलापथकांच्या माध्यमातून कोरोना जनजागृती
लातूर : जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ११ कलापथकांद्वारे कोरोना जनजागृती केली जात आहे. २० फेब्रवारीपर्यंत ही मोहीम राबविली जाणार असून, मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लातूर, औसा, रेणापूर, देवणी, जळकोट, शिरुर अनंतपाळ, रेणापूर, चाकूर, उदगीर आदी तालुक्यात जनजागृती होणार आहे.मास्क, फिजीकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी उपाययोजनांबाबत माहीती दिली जाणार आहे.
माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी
लातूर : शहरातील इंदिरानगर येथे माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गायक दत्ता शिंदे आणि वैशाली शिंदे यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास राहूल जाधव, सिताताई वाघमारे, रमेश गायकवाड, बापू गायकवाड, नागेश कांबळे, साधू कांबळे आदींसह परिसरातील नागरीकांची उपस्थिती होती.
स्वामी दयानंद विद्यालयात पालक मेळावा
लातूर : तालुक्यातील कव्हा येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्खाध्यापिका अरुणा कांदे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच पद्मीन सोदले, देशमुख, कदम, मानकरी, धामनगावे, मोकाशे, थंबा, आक्कलदिवे, मस्के, घार आदींची उपस्थिती होती. प्रारंभी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या सराव परिक्षेचे पेपर उपस्थित पालकांना दाखविण्यात आले. त्यांना अभ्यास करताना येणा-या अडचणी तसेच पालकांच्या अडचणीही यावेळी जाणून घेण्यात आल्या. याबरोबरच विद्यार्थ्यांनी वार्षीक परिक्षेला सामोरे जाताना परीक्षेची कशी तयारी करावी, अभ्यासाचे नियोजन कसे करावे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला माता-पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने स्वच्छता मोहीम
लातूर : शहरातील ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक परिसराची स्वच्छता करून त्या परीसरातील झाडांना पाणी देण्यात आले. यावेळी रवि अर्जुने, ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, ॲड. वैशाली यादव-लोंढे, ऋषिकेश दरेकर, आशा अयचित, लक्ष्मीताई बटनपुरकर, सिताराम कंजे, विक्रांत भुमकर, कृष्णा वंजारे, शिवशंकर सुफलकर, दयाराम सुडे, महेश भोकरे, कुंदन सरवदे, बालाजी उमरदांड आदींसह सदस्यांची उपस्थिती होती.
बार्शी रोडवर गतिरोधक बसविण्याची मागणी
लातूर : एमआयडीसी परिसरातील पाच नंबर चौक ते महिला तंत्रनिकेतन रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर शासकीय महिला तंत्रनिकेतन, महिला आयटीआय महाविद्यालय आहे. यापुर्वी गतिरोधक होते मात्र, डांबरीकरण झाल्याने गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत. त्यामूळे संबधित यंत्रणांनी अपघाताचा धोका लक्षात घेता गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.
लेखन आपल्या भेटीला उपक्रमाचे आयोजन
लातूर : हरंगुळ येथील जनकल्याण निवासी विद्यालयात लेखन आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्यिक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश रायचूरकर, मधुकर कुलकर्णी, रवींद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षका शर्मिष्ठा कुलकर्णी, स्नेहा थोरात, वैष्णवी काळे, अभय दुधाळ, रेणूका इंगळे, शाश्वत देशमुख, साहिल बिराजदार, ऋतुराज दारफळकर, अक्षरा तापडे, प्रदिप मुसांडे, रघुनाथ पाटील, मन्मथ खिचडे यांची उपस्थिती होती.
शाहू महाविद्यालयात सीपीआर कार्यशाळा उत्साहात - फोटो
लातूर : येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील एनसीसी विभागाद्वारे सीपीआर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेेतील उपअधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान, डॉ. व्यंकटेश जोशी, डॉ. किरण तोडकरी यांनी व्याख्यान आणि प्रात्यक्षिकाद्वारे एनसीसी कॅडेट्सना मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य डॉ. ए.जे. राजू, प्रा. एस.एन. शिंदे, डॉ. ओमप्रकाश शहापूरकर, डॉ. अर्चना टाक, प्रतिक्षा मोरे, अनुश्री गायकवाड, धीरज माळगे आदींसह प्राध्यापक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.