शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पूल बांधकामासाठी औरादमधील महामार्गावर रास्तारोको आंदोलन

By हरी मोकाशे | Updated: May 8, 2023 17:46 IST

आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले

औराद शहाजानी :लातूर- जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील औराद शहरातील शेळगीमाेड येथे तात्काळ पूल बांधकाम करण्यात यावे, या मागणीसाठी साेमवारी औराद शहाजानीकरांनी महामार्गावर रास्ताराेकाे आंदोलन केले. तेव्हा एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

लातूर- जहिराबाद राष्ट्रीय महामार्ग निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीतून जातो. या महामार्गावरील येथील चौकातील पुलाचे बांधकाम करण्यासाठी दीड वर्षांपूर्वी खोदकाम करण्यात आले आहे. दरम्यान, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे काम बंद ठेवण्यात आल्याने अपघाताला निमंत्रण ठरत आहे. तसेच पर्यायी रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडल्याने सातत्याने अपघात होत आहेत.

याशिवाय, ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित नसल्याने महामार्गालगतच्या अनेक दुकानांत पावसाचे पाणी जाऊन व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच महामार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. तेरणा नदीवरील पुलाला खड्डे पडल्याने आणि बॅरिकेट नसल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करीत औराद शहाजानीतील व्यापारी, नागरिक, विविध पक्षाचे पदाधिकारी, छावा संघटना आणि परिसरातील तगरखेडा, सावरी, शेळगी येथील नागरिकांनी रास्तारोको आंदोलनाला पाठिंबा देत सहभागी झाले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व नागरिक एकत्र आले आणि शेळगी मोड येथील महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, छावाचे विजय घाडगे पाटील, भगवान माकणे, तुळशीदास साळुंके, राजा वलांडे, अशोक कत्ते, राजा पाटील, सतीश देवणे, दीपक थेटे, विष्णू महाराज काेळी, किरण पाटील, मदन बिरादार, रणजित सूर्यवंशी, अमोल ढोरशिंगे, व्यंकट बिरादार, सुधाकर शेटगार, विद्यासागर पाटील, अशाेक थेटे, मधु बियाणी, विलास कांबळे, शहाजान नाईकवाडे, कन्हैय्या पाटील, वैभव गाेमसाळे यांच्यासह परिसरातील विविध गावांचे लाेकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी सहभागी झाले होते.

यावेळी एमएसआरडीसीचे अभियंता अशाेक इंगळे यांनी आंदोलनकर्त्यांना लवकरच पुलाचे काम सुरू करु, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन साेडण्यात आल्याचे सपाेनि. पंकज शिनगारे यांनी सांगितले. यावेळी गुत्तेदार कंपनीचे प्रतिनिधी अभियंता माेहन कसबे उपस्थित हाेते.

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलन