राजर्षी शाहू महाविद्यालयात आज रक्तदान शिबिर
लातूर : स्वातंत्र्यसेनानी, ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत लोकमत आणि राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिर होणार आहे. शिबिराचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
२ जुलैपासून जिल्ह्यात शिबिर घेण्यात येत आहे. आतापर्यंत २५१ बाटल्यांचे रक्तसंकलन झाले असून, लोकमत कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरांत ४६, आयएमएच्या शिबिरांत ३२, औसा येथे २३, रेणापूर येथे ५१, औराद शहाजानी येथे ३०, उदगीर येथे ५१ आणि जळकोट येथे १८ असे एकूण २५१ बाटल्या रक्त संकलन झाले आहे.