...
हेर ग्रामस्थांतर्फे डोके यांचा सत्कार
उदगीर : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक लक्ष्मण डोके यांची देवणी येथे बदली झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करुन निराेप देण्यात आला. यावेळी माजी सभापती सोपानराव ढगे, तंटामुक्ती अध्यक्ष बळवंत घोगरे, पंडित ढगे, माजी सरपंच तुळशीराम बेंबडे, माजी चेअरमन दिलीप बिरादार, भागवत गुराळे, रोखपाल एस.एस. टेंकाळे, मगबुल पठाण, सोसायटीचे सचिव शिवाजी बस्तापूरे आदी उपस्थित होते.
...
कॅरिबॅगचा वापर करणा-यांवर कारवाई करा
अहमदपूर : शहरात कॅरिबॅग व प्लास्टिकचा वापर करणा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी यशवंत प्रतिष्ठाणच्या वतीने पालिका मुख्याधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर संस्था सचिव डॉ. जीवन गंगणे, संजय पवार, महेश सोलापूरे, प्रमोद पवार यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत. कॅरिबॅग वापरणा-यांवर कारवाई करावी, अशी सातत्याने मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप करण्यात आला.