तालुक्यातील खंडाळी येथे आ. बाबासाहेब पाटील समर्थकांनी बाजी मारली आहे. सावरगावात दिलीपराव देशमुख समर्थक पॅनेल विजयी झाले. सोरा येथे विनायकराव पाटील समर्थकांनी विजय मिळविला. ४९ ग्रामपंचायतींच्या ३७७ जागांपैकी २२५ ठिकाणी महिलाराज आले आहे. तालुक्यातील ढाळेगाव येथील ग्रामपंचायत ३० वर्षांपासून शिवाजीराव भिकाणे यांच्या ताब्यात असून, यंदाही त्यांनी ११ पैकी ८ जागा जिंकून बाजी मारली आहे.
मतमोजणीस सकाळी १० वा. प्रारंभ होऊन एक वा. पूर्ण झाली. विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ज्या विजयी उमेदवारांनी आपले निवडणूक प्रमाणपत्र घेतले नाही, त्यांनी तहसील कार्यालयातून घेऊन जावे, असे आवाहन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
२५० जण पहिल्यांदा सदस्य..
तालुक्यातील ३०३ पैकी २५० पेक्षा अधिक सदस्य हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. तरुणांचा अधिक समावेश आहे. २२५ ठिकाणी महिला विजयी झाल्या आहेत. मतमोजणीनंतर जल्लोष करण्यात आला. तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या हडोळतीमध्ये प्रस्थापितांना धक्का दिला बसला आहे. नवीन तरुण विजयी झाले आहेत.