शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्याध्यापक संघाचे धरणे आंदोलन

By संदीप शिंदे | Updated: August 6, 2024 16:36 IST

जुनी पेन्शन योजना लागू करा, अनुदान टप्पा लागू करण्याची मागणी

लातूर : शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध शैक्षणिक समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

राज्यातील अशंतः अनुदानित, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलित धोरणानुसार अनुदान टप्पा तत्काळ लागू करावा. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व १ नोव्हेंबर २००५ नंतर अनुदानावर आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी. १५ मार्च २०२४ चा सुधारित संच मान्यता शासन निर्णय रद्द करून शाळा तिथे मुख्याध्यापक पद हे धोरण असावे आदी मागण्या करण्यात आले.

आंदोलनात मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश देशमुख, वसंतराव पाटील, सी. के. साळुंके, शिक्षण संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष रामदास पवार, सचिव बाबूराव जाधव, प्राचार्य डी.एन. केंद्रे, प्रा. गोविंदराव घार, जे.जी. सगरे, पी. एन. बंडगर, मधुकर पात्रे, कालिदास माने, प्रा. ओमप्रकाश साकोळकर, जयश्री ढवळे, शिवराज म्हेत्रे, सचिव बजरंग चोले, कालिदास शेळके, उमेश पाटील, रमेश मदरसे, सचिन साबणे,दत्तात्रय पारवे, अनिल कारभारी, रामेश्वर कदम, सदस्य बालाजी मुंडे, एस व्ही. मादलापुरे, परवेजखान पठाण, विशाल पात्रे, जयश्री पाटील, बाळासाहेब चव्हाण,मदन धुमाळ, दयानंद कांबळे, गंगाधर आरडले, संघटनेचे अमोल चामे, अनिल दरेकर, उमेश पाटील आदी सहभागी होते.

कॅशलेस मेडिकल योजना लागू करावी...१५ मार्च २०२४ रोजीचा वर्ग ५ वी व ८ वी च्या वर्गांचा दर्जावाढ निर्णय तत्काळ रद्द करावा. शिक्षक व कर्मचारी भरती तत्काळ सुरू करावी. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल योजना तत्काळ लागू करावी. १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :laturलातूरTeacherशिक्षकagitationआंदोलन