महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने, सचिव रवी सूर्यवंशी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, गृहविलगीकरणात दुरुस्त होणाऱ्या रुग्णांना काही रुग्णालयात दाखल करून घेतले जात आहे. त्यामुळे खाटा शिल्लक नाहीत. ऑक्सिजनयुक्त खाटांची कमतरता आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून खासगी रुग्णालयांची पाहणी करावी. डब्ल्यूएचओचे नियम न पाळणाऱ्यांवर कार्यवाही करावी. त्यामुळे गरजू रुग्णांसाठी रुग्णालये खुली होऊन गंभीर रुग्णांना जीवदान मिळेल तसेच खासगी रुग्णालये दोन महिन्यांसाठी अधिग्रहित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष भागवत शिंदे, शहराध्यक्ष मनोज अभंगे, मनविसे जिल्हाध्यक्ष किरण चौहान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गरजू रुग्णांच्या सेवेसाठी खासगी रुग्णालये अधिग्रहित करावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:17 IST