निलंगा येथील पंचायत समितीत मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बाेलत हाेते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती राधा बिराजदार, माजी सभापती अजित माने, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, नायब तहसीलदार अरुण माहापुरे, कृषी अधिकारी काळे, ओम बिराजदार, जिलानी बागवान, नितीन पाटील, नारायण इंगळे, बळीराम पाटील, बालाजी पाटील, परमेश्वर बिराजदार, जगदीश पवार, व्यंकट माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आ. पवार म्हणाले, नकाशावरील शेतरस्ते मोकळे करून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या परवानगीची गरज नाही. त्यामुळे ज्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यांनी तत्काळ काढून घ्यावे. अतिक्रमण केलेल्या कोणत्याही शेतकऱ्यांनी याबाबत माझ्याकडून मदतीची अपेक्षा करू नये, अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन त्यांचे काम करताना मी हस्तक्षेप करणार नाही. अतिवृष्टीनंतर मतदारसंघातील ८६ गावांचा दौरा केला होता. या दौऱ्यात शेतरस्ते ही मोठी समस्या असल्याचे समाेर आले आहे. ती साेडविण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचेही ते म्हणाले.
शिवारातील शेतरस्त्याचे प्रश्न साेडविण्याला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST