प्राचार्य अजहर शेख यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ॲनिमेशन चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मांडला होता. शिवाय, इंटेरिअर डिझायनिंग, बांधकाम सुपरवायझर, आर्किटेक्ट, कनिष्ठ महाविद्यालय, नाट्य, नृत्य व संगीत कला महाविद्यालय व आश्रमशाळा उभारून त्या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. व्यावसायिक शिक्षणात केलेल्या कामगिरीची दखल घेत त्यांना फ्रान्सच्या सॉरबन विद्यापीठाकडून मानद पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमास कुलगुरू डॉ. जॉन थॉमस, डॉ. फेडरेट यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे, मंगेश सोमाणी, प्रा. रघुनाथ कुलकर्णी, इंजि. किशोर कुलकर्णी, प्रा. चंद्रकांत मुळे आदींनी कौतुक केले.
प्राचार्य अजहर शेख यांना मानद पीएच.डी. प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST