शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

निलंगा तालुक्याचे विभाजन रोखा; कृती समितीचे लाक्षणिक उपोषण

By हरी मोकाशे | Updated: July 24, 2023 17:35 IST

कासारशिरसीचे अप्पर तहसील कार्यालय गैरसोयीचे

निलंगा : कासारशिरसी येथील अप्पर तहसील कार्यालय आमच्या गावांसाठी गैरसोयीचे आहे. त्यामुळे आमची गावे अप्पर तहसील कार्यालयाशी जोडू नका. तसेच निलंगा तालुक्याचे विभाजन करू नका, अशी मागणी करीत कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर तालुका एकसंघ कृती समितीच्या वतीने सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

औसा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या निलंगा तालुक्यातील ६३ महसुली गावांसाठी कासारसिरसी (ता. निलंगा) येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत शासनाने आदेश काढला आहे. तेथून कासारशिरसी, कासार बालकुंदा, मदनसुरी, भूतमुगळी अशा ६३ महसुली गावांचा प्रशासकीय कारभार चालणार आहे. दरम्यान, त्यास कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर तालुका एकसंघ कृती समितीने विरोध करीत लाक्षणिक उपोषण केले.

आम्हाला निलंग्याचे तहसील व पंचायत समिती, उपविभागीय कार्यालय, पोलिस अधिकारी, सहकार, भूमिअभिलेख कार्यालय, न्यायालय सोयीचे आहे. एकाचवेळी विविध विभागांची कामे करता येतात. शिवाय, निलंगाजवळ असल्याचा ठराव तालुक्यातील जवळपास ४५ ग्रामपंचायतींनी घेऊन आम्हाला निलंगा तहसील कार्यालयातच ठेवाचे, अशी मागणी केली आहे.

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी तालुक्याचे कधीही विभाजन होऊ दिले नाही. विविध विभागीय व उपविभागीय कार्यालये येथे आणली. मात्र आता तालुक्याचे तुकडे पाडण्याचे काम काही राजकारणी करीत असल्याचा आरोप करण्यात आला.यावेळी कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर तालुका एकसंघ कृती समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर तालुकाध्यक्ष संभाजी तारे, कार्याध्यक्ष अशोक सूर्यवंशी, सचिव दयानंद मुळे, उपाध्यक्ष रामकिशन सावंत, अनिल आरीकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महाविकास आघाडीचा पाठिंबा...

उपोषणस्थळी भेट देऊन कृती समितीच्या मागणीस महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) अविनाश रेशमे, काँग्रेसचे डॉ. अरविंद भातांब्रे, राष्ट्रवादीचे पंडित धुमाळ, दयानंद चोपणे, इस्माईल लदाफ, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, अमोल सोनकांबळे, धम्मानंद काळे, विलास सूर्यवंशी, विलास माने, देवदत्त सूर्यवंशी, गोविंद सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. दरम्यान, संतप्त जमावाने आमदार अभिमन्यू पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

टॅग्स :laturलातूर