शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

लातुरात मांजा विक्रेत्यांवर पाेलिसांचा छापा; एक ताब्यात, नायलाॅन मांजा जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: January 13, 2023 18:49 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

लातूर : शहरातील लेबर काॅलनीत एका दुकानावर पाेलिसांनी छापा मारून बंदी असलेला नायलाॅन मांजा जप्त केला आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्या आदेशानुसार नायलाॅन, सिंथेटिक मांजाप्रकरणी कारवाई केली. मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्याचा छंद अनेकजण जोपासतात. मात्र, त्यासाठी दोराऐवजी नायलॉन मांजा वापरत आहे. परिणामी, पक्षी, लहान मुले, वाहनधारक जखमी झाले. याबाबत नायलॉन, सिंथेटिक मांजामुळे पर्यावरणाला, पक्षांसाठी धाेकादायक ठरत आहे. अशा नायलॉन मांजावर पाेलिसांची करडी नजर असून, कारवाईसाठी पथक तयार केले आहे. कारवाईसाठी पथकाने माहिती मिळविली. दरम्यान, खबऱ्याने माहिती दिली. त्यानुसार लेबर कॉलनीतील भारत ट्रेडर्स दुकानावर छापा मारला. यावेळी बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करताना शेख आगाखान खमरोदीन शेख (वय ५४, रा. लेबर कॉलनी लातूर) याला ताब्यात घेतले. दुकानाची झाडाझडती घेतली असता, ६३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत गांधी चौक पाेलिस ठाण्यात गुरनं. २० /२०२३ कलम १८८ भादंवि आणि कलम ५ पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई...ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, अंमलदार रवी गोंदकर, यशपाल कांबळे, रियाज सौदागर, नकुल पाटील यांच्या पथकाने केली आहे.

बंदी असलेल्या मांजावर आहे नजर...लातूरसह जिल्ह्यातील पतंग, पतंगाचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी पाेलिसांकडून केली जात आहे. यांना नायलॉन मांजा, इतर विविध प्रकारचा मांजा विक्री करता येणार नाही. याबाबत संबंधित दुकानदारांना समज देण्यात आली आहे. तरीही काेणी कायदा माेडून मांजा विक्री करताना आढळून आल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर