औसा टी पॉईंट येथून दुचाकीची चोरी
लातूर : औसा टी पॉईंट ते पाच नंबर चौकादरम्यान रस्त्यावर पार्किंग केलेल्या एमएच २४ एडी ४१५७ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत सचिन शिवाजी थोरात (रा. उंबडगा, ता. औसा, हमु. गौतम नगर, खणी भाग) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भरधाव वेगातील दुचाकीची धडक; एकजण जखमी
लातूर : भरधाव वेगातील एमएच २४ एए ७३९७ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून पाठीमागून जोराची धडक दिली. उदगीर तालुक्यातील हेर येथे सदर अपघात घडला. या अपघातात फिर्यादीचा भाचा जखमी झाला. याबाबत सचिन मारोती कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिसात एमएच २४ एए ७३९७ क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.
भरधाव वेगात राँग साईडने येऊन धडक
लातूर : देगलूर रोड सोमला तांडा येथे भरधाव वेगात राँग साईडने आलेल्या एमएच २४ एल ११४३ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाने फिर्यादीच्या मोटारसायकलला समोरून धडक दिली. या अपघातात फिर्यादी जखमी झाला असून, दुचाकीचे नुकसान झाले आहे. याबाबत इब्राहिम सिराजोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच २४ एल ११४३ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरूद्ध उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद आहे.
शेतात गाजर गवत टाकल्याने मारहाण
लातूर : तू आमच्या शेतात गाजर गवत व बाभळीचे काटाडे का टाकलेस, असे विचारले असता फिर्यादीला मारहाण झाल्याची घटना चाकूर तालुक्यातील टाकळगाव शिवारात घडली. फिर्यादी व फिर्यादीच्या वडिलांना कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले. याबाबत अजय माधव माने (रा. टाकळगाव, ता. चाकूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास रामराव सावंत व अन्य सहा जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
खाडगाव रोड येथून दुचाकीची चोरी
लातूर : खाडगाव रोड येथून एमएच २४ एएन ३५६२ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. दुचाकी घरासमोर पार्किंग केली होती. याबाबत सतीश बालाजी राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. गिरी करीत आहेत.
घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी चोरीला
लातूर : राजे शिवाजीनगर येथील घरासमोर पार्किंग केलेल्या एमएच २४ एके २१६६ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली, असे सदानंद शिवाजी आदुडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोहेकॉ. बिराजदार करीत आहेत.