उदगीर : येथील जमहूर विद्यालयात लिबरल एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. अंजुम खादरी यांच्या पुढाकारातून मिशन ग्रीन उदगीर अंतर्गत स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, मौलाना नौशाद कास्मी, नगरसेवक राजकुमार भालेराव, मिर्जा पाशा बेग, सचिव डॉ. अंजुम खादरी, अध्यक्ष हाबिबुरहमान, शेख इब्राहिम सत्तार, मोतीलाल डोईजोडे, हाश्मी हुसैनसाब, खादरी इर्शाद, कुरैशी युनूस, प्राचार्य राजापटेल अ. बाकी, मुख्याध्यापिका हाश्मी शाहजहा यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. अंजुम खादरी म्हणाल्या, कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व समजून घेतले आहे. तेव्हा जागा असेल तेथे वृक्षारोपण करून ते वृक्ष जतन करण्याचा संकल्प केला पाहिजे. सूत्रसंचालन अहमद सरवर यांनी केले. प्राचार्य राजापटेल बाकी यांनी आभार मानले.