अध्यक्षस्थानी माजी सरपंच निर्मला वाडकर होत्या. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील, माजी उपसरपंच गंगाधरराव केराळे, बस्वराज ईरवाने, शहराध्यक्ष शेख हुसेन पप्पूभाई, भागवत फुले, सुरेश मुंडे, नीलेश देशमुख, सलीम तांबोळी, विजय धनेश्वर, नागेश तत्तापुरे, सोमेश्वर शेटे आदी उपस्थित होते.
यावेळी विलासराव पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकटात ऑक्सिजनची कमतरता जाणवली. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून संवर्धन करणे आवश्यक आहे. कार्यक्रमास ॲड. माधवराव पाटील, गंगाधर हिंगणे, तुकाराम वागलगावे, महादू हिंगणे, माणिक कस्तुरे, सुरेश पाटील, मंगेश ढगे, संगम कस्तुरे, मुरलीधर पाटील, महेश चापुले, संजय भोसले, ज्ञानोबा लांडगे, दिलदार सय्यद, परमेश्वर चवळे, केरबा शेळके, वसंत काळोजी, रामदास काळोजी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रणजित पाटील यांनी केले. आभार सुरेश पाटील यांनी मानले.