लॉकडाऊनच्या दरम्यान व्यवसाय बंद ठेवण्यात आलेले आहेत. व्यापा-यांना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागत असल्याने दुकानामधील कर्मचा-यांचे वेतन देणे सुद्धा जिकरीचे ठरू लागलेले आहे. सदर व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याने आर्थिक घडी विस्कटलेली असून त्याची परिस्थिती बिकट होऊ लागलेली आहे. त्याचबरोबर शासनाचा महसुल सुद्धा बुडत आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये अशंतः शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूचे व्यवसाय करणारी दुकाने सुरु झालेली आहेत. मात्र इतर दुकाने अजूनही बंदच आहेत. व्यापा-यांच्या सहानुभूतीचा विचार करून नियम पाळण्याचे बंधन घालत व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी. अशी मागणीही निवेदनाद्वारे भाजपाच्या नगरसेविका भाग्यश्री कौळखेरे यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर नगरसेविका ज्योती आवस्कर यांचीही स्वाक्षरी आहे.
कोरोनाचे नियम पाळून व्यवसाय करण्यास परवागनी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:18 IST