मे-जून २०२१ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत विज्ञान व तंत्रज्ञान या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा पंचायत समिती गट शिक्षण कार्यालय, उमरगा येथे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षण कार्यालय उमरगाचे विस्तार अधिकारी कानडे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उमरगा रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. बुटुकणे यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे उस्मानाबाद जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ जिल्हा कार्याध्यक्ष किशोर पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र स्वामी, सहसचिव चेंडकाळे आर.टी., कोषाध्यक्ष अजित साळुंखे, विस्तार अधिकारी सुरवसे, महाबोले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उमरगा तालुक्यातील लोकमान्य टिळक विद्यालय कदेर, शिवशक्ती विद्यालय एकुरगा, महात्मा बसवेश्वर विद्यालय उमरगा, भारत विद्यालय उमरगा, के. डी. शेंडगे विद्यालय उमरगा या विद्यालयांतील १८ विद्यार्थ्यांचा तसेच लोहारा तालुक्यातील धर्मवीर संभाजी विद्यालय भोसगा, बालाजी विद्यालय तावशी गड, श्री बसवेश्वर हायस्कूल जेवळी, शरद पवार हायस्कूल राजेगाव या विद्यालयांतील ६ विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रशस्ती प्रमाणपत्र व पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमरगा तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष विनोद गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन लोहारा तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव विश्वनाथ गर्जे यांनी केले. लोहारा तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष विनायक बगले यांनी आभार मानले.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमरगा तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सदाशिव डिगुळे, उपाध्यक्ष पोतदार आर.डी., सहसचिव सूर्यवंशी एस.डी., कोषाध्यक्ष राठोड एस.के. तसेच सदस्य शहापुरे एस.जी., सरवदे आर.आर., देशमाने व्ही.जी., बिराजदार डी.पी., कांबळे एन.एस. आदींनी परिश्रम घेतले.