शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ओढ्याच्या पाण्यात अर्धवट जळालेले प्रेत वाहून गेले, लातूर जिल्ह्यातील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: June 8, 2025 05:33 IST

Latur News: लातूर जिल्ह्यातील भडी गावामध्ये मन हेलावून टाकणारी घटना शनिवारी रात्री घडली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ओढ्याला आलेल्या पाण्यात प्रेत वाहून गेले आणि नंतर गावातील युवकांनी एकत्र येत प्रेतावर पुन्हा अंत्यसंस्कार केले.

- राजकुमार जाेंधळे 

लातूर- जिल्ह्यातील भडी गावामध्ये मन हेलावून टाकणारी घटना शनिवारी रात्री घडली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ओढ्याला आलेल्या पाण्यात प्रेत वाहून गेले आणि नंतर गावातील युवकांनी एकत्र येत प्रेतावर पुन्हा अंत्यसंस्कार केले.

भडी येथील ऋत्विक दगडू कांबळे (वय २०) हा युवक बांधकाम मजूर म्हणून काम करत हाेता. नेहमीप्रमाणे ताे लातूर शहरानजीक १२ नंबर पाटी येथे एका बांधकामावर गेला हाेता. दरम्यान, तेथे त्याचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याचे प्रेत लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. संतप्त नातेवाईकांनी शुक्रवारी सायंकाळपर्यंत हे प्रेत ताब्यात घेतले नाही. शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेत भडी गाव गाठले. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ओढ्याच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर नातेवाईक आपापल्या घरी परतले. दरम्यान, सायंकाळी माेठा पाऊस झाला अन् ओढ्याला पूर आला. पुराच्या पाण्यात जळणारे प्रेत वाहून गेले. हा प्रकार गावातील काही तरुणांनी पाहिला. त्यांनी ओढ्यातील वाहत जाणारे प्रेत ताब्यात घेतले आणि ओढ्याच्याच काठावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना भडी (ता.जि. लातूर) येथे घडली. मयत युवक ऋत्विक कांबळे याच्या पश्चात आई आणि आजी आहे.

घरात एकटाच कमवता...मयत ऋत्विक कांबळे हा युवक घरातील एकटाच कमावता होता. त्याच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. ताे अविवाहित असून, आई आणि आजीचा एकमेव आधार हाेता, अशी माहिती गावातील नातेवाईकांनी दिली.

स्मशानभूमीचा प्रश्न कायम...स्मशानभूमी नसल्याने ओढ्याच्या काठावरच अंत्यसंस्कार केले जातात. शनिवारी याच ओढ्याच्या काठावर मयत ऋत्विक कांबळे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, माेठ्या पावसामुळे ओढ्याला पूर आला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत पुराच्या पाण्यात वाहून जाताना तरुणांनी पाहिले. ही विटंबना पाहून तरुणांनी पुन्हा त्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले. स्मशानभुमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर