: बदलत्या वातावरणाने आंबे माेहरावर भुरीचा प्रादुर्भाव झाल्याने, यंदा आंबा उत्पादनात घट हाेणार आहे, अशी शक्यता फळ उत्पादक शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. यंदाच्या हंगामात दरवर्षीपेक्षा अधिक आंबा माेहर आला. मात्र, बदलणाऱ्या वातावरणाचा माेहर लागवडीला फटका बसला. आहे त्या माेहराला गळती लागली असून, त्यावर भुरीचा प्रादुर्भाव झाला आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगाेळ परिसरात सध्या आंब्याचे वृक्ष माेहराने बहरले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात फळांचा राजा आंबा माेठ्या प्रमाणावर दाखल हाेताे. डिगोळ परिसरातील सुमठाना, सताळा, चामरगा, कबनसांगवी, डिग्रस, करडखेल, आंबेवाडी, आजनसोंडा, बोळेगाव, बावलगाव, आंबेवाडी या भागांत गतवर्षी आंब्याचे उत्पादन माेठ्या प्रमाणावर घटले हाेते. यंदा मोहर चांगला लागला आहे; मात्र वातावरणातील बदलाने भुरी, तुडतुडेसारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
आंबे मोहरावर भुरीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:19 IST