जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष उटगे बोलत होते. कोरोनामुळे अनेक आजारी लोकांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनुसार २१ मार्च रोजी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून तालुका, ग्रामस्तरावर रक्तदान शिबिर होत आहे. या शिबिरात काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी केले आहे. बैठकीस अभय साळुंके, विजयकुमार पाटील, ॲड.हेमंत पाटील, कल्याण पाटील, दत्तोपंत सूर्यवंशी, विलास पाटील, ॲड.प्रमोद जाधव, सुभाष घोडके, मारोती पांडे, ॲड.बाबासाहेब गायकवाड, सिराजोद्दिन जहागीरदार, प्रा.एकनाथ पाटील, प्रवीण पाटील, ॲड.प्रदीपसिंह गंगने, डॉ.उमाकांत जाधव, राम चामे, शरद देशमुख, सुनीता आरळीकर, प्रवीण सूर्यवंशी, डॉ.अरविंद भातांब्रे, प्रा.सुधीर पोतदार, प्रा.ओमप्रकाश झुरूळे, सपना किसवे, ॲड.सुहास बेद्रे, सोनू डगवाले, सहदेव मस्के, विकास महाजन, शकील शेख यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:20 IST