पोलिसांनी सांगितले, फिर्यादी नामदेव जनार्दन केदार व त्यांचा चुलत भाऊ आपली दुचाकी क्रमांक एमएच २४ बीजे ४५३९ ने कारेपूर शिवारातील रस्त्यावरून चालले होते. भरधाव वेगातील कार क्रमांक एमएच १२ ईएम ६१०० च्या चालकाने हयगय व निष्काळजीपणाने दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली. या अपघातात फिर्यादीचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे. याबाबत फिर्यादी नामदेव केदार यांच्या तक्रारीवरून एमएच १२ ईएम ६१०० च्या चालकाविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. थोरमोटे करीत आहेत.
शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण
लातूर : आई राहत असलेली जागा वाटून का देत नाहीस या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना कडमुळी रोड येथे घडली. याप्रकरणी चंद्रकांत भागुराम जाधव यांच्या तक्रारीवरून नवनाथ भागुराम जाधव यांच्याविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. या घटनेत फिर्यादीच्या डोळ्याचेवर हातातील दगडाने जखमी केले आहे. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोहेकॉ लांडगे करीत आहे.
विद्युत मोटारीसह वायरची चोरी
लातूर : डांगेवाडी साठवण तलाव येथून विद्युत मोटारीचे २०० फूट वायर आणि दोन विद्युत मोटारी चोरी झाल्याची घटना २४ मे रोजी घडली. याप्रकरणी फिर्यादी प्रशांत दत्तात्रय पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दोन मोटारी १७ हजार ५०० आणि वायर ९ हजार ५०० असा एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असल्याचे नमूद आहे. पुढील तपास पो.ना. कसबे करीत आहेत.