शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवस बळीराजासाठी; शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामी राहून अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या अडचणी

By हरी मोकाशे | Updated: September 1, 2022 11:52 IST

राज्य शासनाच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा नवा उपक्रम १ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आला आहे.

लातूर : शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम गुरुवारपासून सुरु करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने विभागीय कृषी सहसंचालक दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह कृषी विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री विविध गावांत शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. तिथेच मुक्काम करुन गुरुवारी सकाळीही ग्राम संजीवनी समितीच्या बैठका घेत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, नैराश्य व त्यातून होणाऱ्या आत्महत्या हे समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करुन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा नवा उपक्रम १ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रशासनातील सर्व अधिकारी, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ हे संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून त्यांना दैनंदिन शेतीच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी जाणून घेणार आहेत. 

या उपक्रमाअंतर्गत बुधवारी रात्री विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर हे लातूर तालुक्यातील हरंगुळ येथे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने हे उदगीर तालुक्यातील तादलापूर येथे, आत्माचे प्रकल्प संचालक आर.एस. पाटील हे निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे मुक्कामी राहिले होते. तसेच कृषी विभागाचे अन्य अधिकारीही निवडलेल्या गावांत मुक्कामी होते. रात्री शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

लक्ष्मण रेषेच्या पुढे जाऊन काम केले पाहिजे...जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी तादलापूर येथे बुधवारी रात्री ११ वा. पर्यंत शेतकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सरपंच अंबिका अविनाश पाटील, उपसरपंच पंडित दवर्षे, कृषी सहाय्यक वाघमारे, पोखराचे कर्मचारी राठोड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी गावसाने यांनी कृषीच्या प्रत्येक योजनांची माहिती देऊन आढावा घेतला. तेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. त्यानंतर गावसाने यांनी शेतकरी शिवशंकर पाटील यांच्या घरी मुक्काम केला. गुरुवारी सकाळी ग्रामसंजीवनी समितीची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर