शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे; लातूर जिल्ह्यातील १७० उपकेंद्रातील आरोग्य सेवा विस्कळीत

By हरी मोकाशे | Updated: October 30, 2023 18:11 IST

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन

लातूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गतचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना सहभागी झाल्याने जिल्ह्यातील जवळपास १७० उपकेंद्रातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पाच- सहा वर्षांपासून ग्रामीण भागात समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यसेवा देत आहेत. कोविड काळात स्वत:ची आणि कुटुंबाची पर्वा न करता झोकून देऊन काम केले. तसेच शासनाच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य सुविधा पुरवित आहेत. मात्र, ते कंत्राटी असल्याने ते शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे बदली, अनुभव बोनस, बढती, महागाई भत्ता असे प्रश्न प्रलंबित आहेत.

केंद्र शासनाने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेकडूनही सातत्याने मागणी होत आहे. मात्र, शासन दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्यात आले.

काम बंद आंदोलनासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांना महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजी गोडगे, सचिव डॉ. सविता भारती, कोषाध्यक्ष डॉ. अजित पाटील यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

उपकेंद्रातील १२ सेवेवर मोठा परिणाम...उपकेंद्रातून गरोदर माता व बालकांना सेवा, असंसर्गजन्य आजार सेवा, संसर्गजन्य आजाराची तपासणी व सेवा, कुटुंब नियोजन, सामान्य आरोग्यसेवा अशा एकूण १२ प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील १७० उपकेंद्रातील या सुविधा ठप्प झाल्या आहेत, असे महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजी गोडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणlaturलातूर