सध्या कोरोनाचे संकट सुरू आहे. परिणामी, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत येथील शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने रविवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य माधव कांबळे, सरपंच नागेश थोंटे, उपसरपंच ज्ञानेश्वर क्षीरसागर, माजी पं. स. सदस्य दत्ता बामणे, चेअरमन विश्वनाथ काळे, प्रमोद बिरादार, संतोष सोमासे, प्रशांत काळे, सुदर्शन देशमुख, किरण तरवडे, लहू भालके, परमेश्वर पुंड, संतोष उजनकर, सचिन बामणे, गणेश चिकले, बालाजी काळे, सुनील खिडसे, अन्वर हवालदार, गुणवंत पवार, रितेश राजमाने, गजानन सूर्यवंशी, सलीम शेख, बबर मणियार, हणमंत केसगिरे, तुकाराम शिंदे, अजिम डांगे, दादामियाँ खुरेशी, सलीम तोंडारे, प्रशांत हाळ्ळे, दत्ता गोरे, अंकुश जाधव, तानाजी सोमासे आदी उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्त वाढवणा येथे ५८ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:29 IST