शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आता जुन्या तारखेत नव्या नोंदी बंद; लातूर जिल्हा परिषदेत ऑनलाइन ई-ऑफिस प्रणाली लागू !

By हरी मोकाशे | Updated: June 26, 2024 18:20 IST

ई- ऑफिस ही ऑनलाइन प्रणाली आहे. त्यामुळे एखादा प्रस्ताव अथवा प्रकरणासंदर्भात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही टिप्पणी केल्यास त्यात आता खाडाखोड करता येणार नाही.

लातूर : जुन्या तारखेत नव्या नोंदी केल्या, टिप्पणीत खाडाखोड करण्यात आली, अशा तक्रारी बहुतांश वेळा होतात. त्या होऊ नयेत आणि अशा कुठल्याही घटना घडू नयेत म्हणून राज्य शासनाने ई- ऑफिस प्रणाली लागू केली आहे. ती जिल्हा परिषदेने अवलंबिली असल्यामुळे आता अशा प्रकारची शंका उपस्थित करता येणार नाही. शिवाय, दाखल प्रस्ताव, तक्रारी जलद गतीने निकाली निघणार आहेत.

जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. गाव, तालुका पातळीवर समस्येचा निपटारा न झाल्यास नागरिक जिल्हा परिषदेकडे धाव घेतात. तसेच विविध योजनांच्या लाभासाठीचेही प्रस्तावही दाखल होत असतात. नागरिक काही वेळेस एखाद्या प्रकरणाची तक्रार करूनही ती वरिष्ठांपर्यंत पोहोचत नाही, अथवा त्याची माहिती अधिकाऱ्यांना वेळेवर मिळत नाही. परिणामी, अपेक्षित वेळेत निर्णय होत नसल्याचे राज्यातील काही ठिकाणी निदर्शनास आले. राज्य शासनाने ई- ऑफिस प्रणाली लागू केली आहे.

टिप्पणीतही खाडाखोड होणार नाही...ई- ऑफिस ही ऑनलाइन प्रणाली आहे. त्यामुळे एखादा प्रस्ताव अथवा प्रकरणासंदर्भात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही टिप्पणी केल्यास त्यात आता खाडाखोड करता येणार नाही. त्याचबरोबर जुन्या तारखेत नव्या नोंदी करता येणार नाहीत. शिवाय, प्रत्येक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी वेळेत प्रस्ताव, तक्रार निकाली काढणे बंधनकारक ठरत आहे.

कारभार आता पेपरलेस...कुठलाही प्रस्ताव अथवा एखाद्याची तक्रार असेल तर त्यासंबंधीची कागदपत्रे स्कॅन करून ई- ऑफिस प्रणालीवर सादर करावयाची आहेत. त्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यास यूजर आयडी आणि पासवर्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे कनिष्ठ अथवा वरिष्ठ सहायकाने दिवसभरात किती प्रकरणे हाताळून नोंदी केल्या याची क्षणार्धात विभागप्रमुखांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर कागदपत्रांचे गठ्ठे आता राहणार नाहीत.

मंत्रालयातून नियंत्रण...जिल्हा परिषदेतील दैनंदिन कामकाजाची माहिती आता एका क्लिकवर मंत्रालयातील अधिकाऱ्यांना मिळणार आहे. शिवाय, यूजर आयडी, पासवर्ड मंत्रालयातून देण्यात येणार आहे. त्यामुळे कारभारावर अधिक नियंत्रण राहणार आहे.

तर होणार कार्यवाही...ई- ऑफिसवर प्रत्येक प्रस्ताव, तक्रार, टपालाची नोंद करावी लागणार आहे. शिवाय, त्यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी मुदतीत कार्यवाही करावी लागणार आहे. त्यात दिरंगाई केल्यास कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. दरम्यान, ई- ऑफिस प्रणालीसाठी अधिकाऱ्यांसह जवळपास ३५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

लवकरच पंचायत समित्या ऑनलाइन...जिल्हा परिषदेत एकूण १४ विभाग आहेत. ही प्रणाली पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर पंचायत समितीत सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पंचायत समितीचा कारभारही लवकरच ऑनलाइन होणार आहे.

प्रशासन अधिक गतिमान...राज्य शासनाने सुरू केलेली ई- ऑफिस प्रणाली जिल्हा परिषदेत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक वेगात होत प्रशासन अधिक गतिमान होणार आहे. कुठलेही प्रस्ताव, तक्रार दबून राहणार नाही. शिवाय, ही प्रणाली पर्यावरणपूरक आहे.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन).

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद