शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकरी होणार बाजार समितीचा उमेदवार! अधिसूचना निघाली, लागा तयारीला

By हरी मोकाशे | Updated: March 10, 2023 17:26 IST

राज्य सरकारने अधिसूचना काढली असून १३ मार्चपर्यंत दावे, हरकतीसाठी मुदत देण्यात आली आहे.

उदगीर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारयादीत, सोसायटी अथवा ग्रामपंचायत मतदारसंघात नाव नसलेल्या शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणुकीसाठी उभे राहण्याचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याची राज्य सरकारने अधिसूचना काढली असून १३ मार्चपर्यंत दावे, हरकतीसाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समिती कार्यक्षेत्रातील १० गुंठे शेती असलेल्या शेतकऱ्यांना आता बाजार समितीसाठी उमेदवार म्हणून रिंगणात उतरता येणार आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका ३० एप्रिलपूर्वी घेण्याबाबत नागपूर खंडपीठाने आदेश दिल्यानंतर निवडणूक प्राधिकरणाने बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सुधारित प्रारूप मतदारयादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा याद्यांमध्ये समावेश करण्यात आला.

विशेष म्हणजे, बाजार समिती निवडणुकीसाठी सोसायटी अथवा ग्रामपंचायत मतदारसंघातील यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्वी निवडणूक लढविता येत होती. दरम्यान, राज्य सरकारने बाजार समिती निवडणुकीसाठी या यादीत नाव नसणाऱ्या शेतकऱ्यांनाही उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात २७ फेब्रुवारी रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून दावे, हरकती मागविण्यात आल्या आहेत.

निवडणूक खर्चही सादर करावा लागणार...बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वी उमेदवारांना निवडणूक खर्च मर्यादा नव्हती. तसेच निवडणूक खर्चही सादर करावा लागत नव्हता. आता राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. निवडणूक झाल्यानंतर ६० दिवसांच्या आत खर्च सादर न केल्यास सदरील उमेदवार अपात्र ठरविण्याची तरतूद नवीन कायद्यानुसार करण्यात आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीElectionनिवडणूक