शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्नियुक्ती आदेश मिळेनात, वेतनही रखडले; लातूर जिल्हा परिषदेतील कंत्राटींचा जीव टांगणीला!

By हरी मोकाशे | Updated: July 10, 2023 17:28 IST

हे कर्मचारी कंत्राटी पध्दतीने जवळपास २७ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना दर सहा महिन्यांनी एक दिवसाचा खंड देऊन जिल्हा परिषदेकडून पुनर्नियुक्ती आदेश दिले जातात.

लातूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील समग्र शिक्षा अभियानअंतर्गत जवळपास १९६ कंत्राटी कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचा नियुक्तीचा कालावधी मे अखेरीस संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्नियुक्ती आदेश मिळणे अपेक्षित होते. मात्र, सव्वामहिना उलटला तरी अद्यापही हे आदेश मिळाले नाहीत. या कर्मचाऱ्यांना धास्ती लागली आहे. विशेष म्हणजे, वेतनही थकित राहिले आहे.

शासनाच्या वतीने समग्र शिक्षा अभियान राबविण्यात येते. या अभियानाअंतर्गत कर्मचाऱ्यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्यात येते. हे कर्मचारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत आहेत. प्राथमिक शिक्षण विभाग आणि शाळा यांच्यामधील दुवा म्हणून हे कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना शाळापूर्व तयारी बैठक, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करुन घेऊन ते ऑनलाईनरित्या सादर करण्यासाठी पाठपुरावा करणे, शिक्षण परिषद, शाळा भेटी, पाठ्यपुस्तक वितरण, गणवेश वाटप निधी वितरित करणे, हंगामी वस्तीगृहासाठी सर्वे यासह अन्य काही शैक्षणिक सर्वे करावे लागतात.

दरम्यान, हे कर्मचारी कंत्राटी पध्दतीने जवळपास २७ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना दर सहा महिन्यांनी एक दिवसाचा खंड देऊन जिल्हा परिषदेकडून पुनर्नियुक्ती आदेश दिले जातात. मात्र, यंदा प्रथमच सव्वा महिना उलटला तरी अद्यापही पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत.

१९६ कंत्राटी कर्मचारी धास्तावले...समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कंत्राटी पध्दतीने अभियंता, संगणक प्रोगामर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, एमआयएस कॉडिनेटर, साधन व्यक्ती, विशेष शिक्षक असे एकूण १९६ जण आहेत. विशेष म्हणजे, हे कर्मचारी सन १९९५ पासून सुरु झालेल्या डीपीईपीपासून कार्यरत आहेत. सन २००१ मध्ये त्याचे सर्व शिक्षा अभियान असे रुपांतर झाले. त्यानंतर सन २०२१ मध्ये सग्रम शिक्षा असा बदल झाला आहे.

सहा महिन्यांनंतर एक दिवसाचा खंड...या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दर सहा महिने झाले की, एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन जिल्हा परिषदेकडून पुनर्नियुक्ती देण्यात येते. दरम्यान, या कर्मचाऱ्यांचा नियुक्तीचा कालावधी ३० मे रोजी संपुष्टात आला आहे. मात्र, त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्नियुक्ती मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही ती मिळाली नाही.

नेहमीप्रमाणे कामावर रुजू...सहा महिने झाले की पुनर्नियुक्ती देण्यात येते, हे जवळपास २५ वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे एक दिवसाचा खंड घेऊन पुन्हा आम्ही कामावर कार्यरत होतो. त्यानुसार आताही रुजू झालो. मात्र, महिना उलटला तरी पुनर्नियुक्ती आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे एक महिन्याचे वेतन थकित राहिले आहे, असे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मी चार दिवसांपूर्वी रुजू...बदली झाल्याने मी चार दिवसांपूर्वी रुजू झालो आहे. त्यामुळे या विषयासंदर्भात मला माहिती नाही. तसेच हा विषय माझ्याकडे येत नाही.- प्रमोद पवार, उपशिक्षणाधिकारी.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद